भाषेचीसुद्धा काय गंमत आहे पाहा, संस्कृत न शिकलेल्या मराठी माणसाला विभक्त आणि अविभक्त ही कुटुंबाची, जोडप्याची विशेषणे वाटतील. या पुस्तकाचे नाव वाचून सुभाषिते, म्हणी, वाक्प्रचार यापैकी काहीही दूरान्वयाने देखील मनात येणार नाही. भगवद्गीतेतील अठराव्या अध्यायात सात्त्विक ज्ञानाचे वर्णन करतांना जगातील वेगवेगळ्या दिसणाऱ्या वस्तू आणि सजीव प्राणी यांच्यात अविभक्तपणे असलेले जे आत्मतत्त्व ते जाणणे म्हणजे खरे…
